India vs Srilanka
Rohit SharmaGoogle

IND vs SL: रोहित शर्मा श्रीलंके विरुद्ध वनडे मालिका खेळणार की नाही? मोठी अपडेट आली समोर

रोहित शर्मा श्रीलंके विरुद्ध होणारी वडने सीरिज खेळणार की नाही? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित भारताबाहेर असल्यानं या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Rohit Sharma IND vs SL: रोहित शर्मा श्रीलंके विरुद्ध होणारी वडने सीरिज खेळणार की नाही? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित भारताबाहेर असल्यानं या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्मा श्रीलंकेविरोधात एकदिवसीय मालिकेत समाविष्ट होणार आहे. बीसीसीआय लवकरच भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करणार आहे. अशातच रोहित वनडे मालिका खेळल्यास या मालिकेसाठी तो भारताचं नेतृत्वही करेल. वरिष्ठ खेळाडूंनी ही एकदिवसीय मालिका खेळावी, असं आवाहन टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं केलं होतं. तसच के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचं संघात पुनरागमन होऊ शकतं.

विराट आणि बुमराहला मिळणार विश्रांती

पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी खूप वनडे सामने होणार नाहीयत. त्यामुळे रोहित आता होणाऱ्या सामन्यांसाठी खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो. रोहितने या सामन्यांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला, तर रोहितलाच संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. तर जसप्रीत बुमराह आणि विराटसारख्या खेळाडूंना या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. गतवर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये प्रभावीपणे कामगिरी करणारा श्रेयस अय्यर आणि के एल राहुलची वापसी होऊ शकते. भारतीय संघ २७ जुलैपासून ७ ऑगस्टपर्यंत श्रीलंकेत तीन टी-२० आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. सूर्यकुमार यादवला टी-२० साठी भारताचं कर्णधारपद दिलं जाऊ शकतं. परंतु, याबाबत अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली नाहीय.

टी-२० साठी भारताची संभाव्य प्लेईंग ११

हार्दिक पंड्या किंवा सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, खलील अहमद, आवेश खान और मोहम्मद सिराज.

वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेईंग ११

केएल राहुल/रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली/शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्किद पंड्या, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com