IPL : प्रवीण कुमारची पोस्ट चर्चेत, कमाल आहे या गोलंदाजाची
मुंबई, 20 एप्रिल, 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15व्या सीझनमध्ये यंदा 10 संघ मैदानात उतरले आहेत. भारतीय क्रिकेटच्या मैदानाला यातून आगळीच शोभा आली आहे. क्रिकेटच्या महासंग्रामात उतरलेल्या एकाहून एक सरस खेळाडूंमध्ये एक गोलंदाज असाही दिसतोय, ज्याच्या नावावर एक खास रेकॉर्ड आहे. यानं आपली शेवटची आयपीएल मॅच आजपासून 5 वर्षांपूर्वी खेळली होती, मात्र त्याचं रेकॉर्ड आजही कायम आहे.
हा गोलंदाज कुणी दुसरा नाही, तर प्रवीण कुमार (Praveen Kumar) आहे. आईपीएलच्या 5 संघांचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज प्रवीण कुमारने आपला शेवटचा आईपीएल सामना गुजरात लॉयन्सच्या (Gujarat Lions ) संघाकडून खेळली होती. त्याच्या गोलंदाजीची जादू काही अशी आहे, की आयपीएलच्या इतिहासात त्याने सर्वाधिक मेडन ओव्हर टाकलेत. खास गोष्ट ही, की प्रवीण कुमारच्या या रिकॉर्डला आजवर कुठलाच गोलंदाज तोडू शकलेला नाही. प्रवीण कुमार गेली 5 वर्ष आयपीएलपासून दूर आहे, हे विशेष.
प्रवीण कुमार खेळाबाबत बोलताना म्हणतो, की क्रिकेट पूर्णत: अनिश्चिततांचा खेळ आहे. यात चित्र बदलण्याची शक्यता प्रत्येक क्षणी असते. कू (koo) वर पोस्ट करून प्रवीणने ही गोष्ट सांगितली.
या खेळाबाबत असे म्हटले जाते, की हा फलंदाजांसाठी तुलनेने सोपा आणि फायद्याचा आहे, पण गोलंदाजांसाठी खूप अवघड आहे. पण याच साच्यात खेळणारा प्रवीण कुमार हा असा खेळाडू आहे, ज्याने फलंदाजांना धावा काढण्यासाठी अक्षरश: तरसवले आहे.
प्रवीण कुमार आयपीएलमध्ये पाच संघांकडून खेळला आहे. आयपीएलच्या सुरवातीच्या दोन सीझन्समध्ये प्रवीण कुमार रॉयल चॅलेंजर्स बॅंगलौरच्या (RCB) संघाचा भाग होते. यादरम्यान वर्ष 2010 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी हॅट्रिकही केली होती. असे करणारे ते आयपीएलचे सातवे बॉलर होते. वर्ष 2011 ते 2013 च्या दरम्यान प्रवीण किंग्स इलेवन पंजाबसाठी खेळला.
अशा प्रकारे प्रवीण कुमारने वर्ष 2008 ते 2017 दरम्यान चार टीम्स, अर्थात किंग्ज इलेव्हन पंजाब, सनराइज़र्स हैदराबाद, गुजरात लॉयन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरकडून खेळत आईपीएलमध्ये 14 ओव्हर मेडन (Over Maiden) फेकलेत. प्रवीण कुमारच्या या ओव्हर्समध्ये आजवर कुठलाच फलंदाज त्याच्या चेंडूवर धावा काढू शकलेला नाही. प्रवीण कुमारच्या आयपीएल करियरबद्दल बोलायचे तर आयपीएलच्या 119 मॅचेसमध्ये प्रवीण कुमारने 90 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.