Mumbai Indians IPL Mega Auction 2025 : "या" 18 वर्षीय खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सचा हट्ट कायम, कोण आहे हा खेळाडू?
आयपीएल 2025 च्या लिलावाची सुरुवात रविवारी 24 नोव्हेंबंरपासून झाली. आज लिलावाचा दुसरा दिवस आहे. एकूण 577 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात 82 खेळाडूंनी अव्वल स्तरावर नोंदणी केली जाणार आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. तर 27 खेळाडूंची दुसरी किंमत 1.50 कोटी आहे. त्याचसोबत 18 खेळाडूंची किंमत 1.25 कोटी आहे आणि 23 खेळाडूंची किंमत 1 कोटी अशा राखीव किंमतीसह यादी करण्यात आली असून उरलेल्या खेळाडूंना 30 लाख ते 75 लाखापर्यंत वर्गीकृत केले आहे. यादरम्यान सर्वात महागडा खेळाडू किती पैसे घरी घेऊन जाणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष होते.
18 वर्षीय खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सचा हट्ट
तर या लिलावा दरम्यान मुंबई इंडियन्सने खेळाडूंचे खाते उघडले आहे. मुंबई इंडियन्सच्या खात्यात 26.1 कोटी बाकी होते आणि त्यांनी 7 परदेशी खेळाडूंसह 16 खेळाडूंना आणखी करारबद्ध करायचे होते. मुंबई इंडियन्सने काल त्यांनी ट्रेंट बोल्टसाठी 12.50 कोटी मोजले होते आणि आज दीपक चहरला 9.525 कोटींसह आपल्या संघात सामिल करून घेतले. तसेच रायन रिक्लेल्टनला 1 कोटींच्या मुळ रकमेत त्यांनी संघात घेतले. तर 18 वर्षीय अल्लाह गझनफर मिस्ट्री स्पिनरसाठी 4.80 कोटी देऊन थक्क केलं आहे.
कोण आहे 18 वर्षीय अल्लाह गझनफर
18 वर्षीय अल्लाह गझनफर फ्रँचायझीने खरेदी केलेला सर्वात महागडा फिरकी गोलंदाज आहे. याने कोविड काळात क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गझनफरने यापूर्वी अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या टी-20 लीगमध्ये सहभाग घेतला आहे. त्याने शारजाह येथे बांगलादेशविरुद्ध 6/26 अशी सर्वोत्तम गोलंदाजी करत 12 विकेट घेतले आहेत. अल्लाह गझनफर याने 16 सामन्यात 4/12 च्या सर्वोत्तम आकड्यांसह 29 विकेट घेतल्या आहेत.