IPL Mega Auction 2025: पहिला दिवस संपन्न! "हे" स्टार खेळाडू झाले पहिल्या लिलावात मालामाल
आयपीएल 2025 च्या लिलावाला काल सुरुवात झाली. यादरम्यान अनेक खेळाडूंवर बोली लावली गेली आहे. एकूण 577 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात 82 खेळाडूंनी अव्वल स्तरावर नोंदणी केली गेली, ज्यांची किंमत 2 कोटी आहे. तर 27 खेळाडूंची दुसरी किंमत 1.50 कोटी आहे. त्याचसोबत 18 खेळाडूंची किंमत 1.25 कोटी आहे आणि 23 खेळाडूंची किंमत 1 कोटी अशा राखीव किंमतीसह यादी करण्यात आली असून उरलेल्या खेळाडूंना 30 लाख ते 75 लाखापर्यंत वर्गीकृत केले गेले. यादरम्यान सर्वात महागडा खेळाडू किती पैसे घरी घेऊन जाणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष होते तर आज लिलावाचा दुसरा दिवस आहे. आजा कोणता खेळाडू सर्वाधिक रक्कम घेऊन जातो याकडे लक्ष आहे.
कालच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू
काल झालेल्या आयपीएल 2025च्या लिलावात श्रेयस अय्यरने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. त्याला पंजाब किंग्सने 26.75 कोटीला संघात सामिल करून घेतले. यानंतर लखनौने ऋषभसाठी २७ कोटी ही किंमत ठेवली त्यामुळे ऋषभ पंत काल पार पडलेल्या आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
कालच्या लिलावात अनसोल्ड ठरलेले खेळाडू
आयपीएल लिलावात अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली काही खेळाडू हे कालच्या लिलावात सर्वात महाग खेळाडू ठरले. तर काहींच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली. परंतू कालच्या लिलावात असे काही खेळाडू होते ज्यांची बोली लावली गेली नाही. त्यामध्ये सर्वात पहिला खेळाडू हा देवदत्त पडिक्कल हा होता. 2024 मध्ये लखन फ्रेंचाइजी ने 7.75 करोडला देवदत्त पडिक्कलला आपल्या संघात घेतले होते. तर त्यानंतर डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, वकार सलामखेल, पियूष चावला, कार्तिक त्यागी, यश धुल, अनमोलप्रीत सिंग, उत्कर्ष सिंग, लवनिथ सिसोदीया, उपेंद्र यादव, श्रेयस गोपाळ हे खेळाडू आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड खेळाडू ठरले.
कालच्या लिलावात सोल्ड ठरलेल्या खेळाडूंपैकी, कोणत्या संघात कोणता खेळाडू सामिल झाला जाणून घ्या
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स संघाने ट्रेंट बोल्टला १२.५० कोटींना आपल्या संघात घेतले. तर नमन धीरला RTMचा वापर करून ५.२५ कोटीच्या लिलावासह आपल्या संघात घेतले तर रॉबिन मिन्झला ६५ लाख आणि कर्ण शर्मा ५० लाखांसह या दोघांना घेतले मात्र त्यांनी इशान किशनला त्यांनी जाऊ दिले.
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्स संघाने आर अश्विनला ९.७५ कोटींना आपल्या संघात घेतले. त्याचसोबत डेवॉन कॉनवे ६.२५ कोटी, खलील अहमद ४.८० कोटी, राहुल त्रिपाठी ३.४० कोटी, विजय शंकर १.२० कोटी, नूर अहमद १० कोटीसह आपल्या संघात घेतले आणि त्याचसोबत रचिन रविंद्र ४ कोटी RTM चा वापर करून संघात सामिल केले.
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स संघाने जॉस बटलरला १५.७५ कोटी, मोहम्मद सिराजला १२.२५ कोटी, कागिसो रबाडाला १०.७५ कोटी, प्रसिद्ध कृष्णाला ९.५० कोटी, महिपाल लोमरोरला १.७० कोटी, कुमार कुशाग्रला ६५ लाख, अनुज रावतला ३० लाख, निशांत सिंधूला ३० लाख आणि मानव सुतारला ३० लाख या खेळाडूंना संघात सामिल केले.
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स संघाने केएल राहुलला १४ कोटी, मिचेल स्टार्कला ११.७५ कोटी, टी नटराजनला १०.७५ कोटी, जॅक फ्रेझर-मॅकगर्कला ९ कोटी, हॅरी ब्रुकला ६.२५ कोटी, आशुतोष शर्माला ३.८० कोटी, समीर रिझवीला ९५ लाख, करुण नायरला ५० लाख, मोहित शर्माला २.२० कोटींना आपल्या ताफ्यात घेतले.
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद संघाने ईशान किशनला ११.२५ कोटी, मोहम्मद शमीला १० कोटी, हर्षल पटेलला ८ कोटी, अभिनव मनोहरला (३.२० कोटी), राहुल चाहरला (३.२० कोटी), ऍडम झाम्पाला (२.४० कोटी), सिमरजीत सिंगला १.५० कोटी, अथर्व तायडेला ३० लाखांसह या खेळाडूंचा प्रवेश आपल्या संघात करून घेतला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जोश हेजलवूडला १२.५० कोटी, फिल सॉल्टला ११.५० कोटी, जितेश शर्माला ११ कोटी, लियाम लिव्हिंगस्टोनला ८.७५ कोटी, रसिक दारला ६ कोटी, सुयश शर्माला २.६० कोटींसह या खेळाडूंना करारबद्ध केले.
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्स संघाने वेंकटेश अय्यरला २३.७५ कोटी, एन्रिच नॉर्कियाला ६.५० कोटी, क्विंटन डी कॉकला ३.६० कोटी, अंगक्रिश रघुवंशीला ३ कोटी, रेहमनुल्ला गुरबाजला २ कोटी, वैभव अरोराला १.८० कोटी, मयंक मार्कंडेला ३० लाखांसह हे खेळाडू कोलकाता नाईट रायडर्स संघात गेले.
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स संघाने जोफ्रा आर्चरला १२.५० कोटी, वनिंदू हसरंगा ५.२५ कोटी, महिश तिक्षणा ४.४० कोटी, आकाश मधवाल १.२० कोटी, कुमार कार्तिकेय ३० लाख या रक्कमेची बोली लावून राजस्थान रॉयल्स या खेळाडूंना संघात घेतले.
लखनौ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स संघाने ऋषभ पंतला २७ कोटी, आवेश खानला ९.७५ कोटी, डेव्हिड मिलरला ७.५० कोटी, अब्दुल सामदला ४.२० कोटी, मिचेल मार्शला ३.४० कोटी, एडेन मार्करमला २ कोटी, आर्यन जुएलला ३० लाख या रक्कमेसह या खेळाडूंना संघात सामिल करून घेतले.
पंजाब किंग्स
पंजाब किंग्स संघाने पहिला लिलाव लागलेला खेळाडू अर्शदीप सिंगला १८ कोटींनी RTMचा वापर करून आपल्या संघात घेतले. त्याचसोबत श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी, युझवेंद्र चहलला १८ कोटी, मार्कस स्टॉयनिसला ११ कोटी, नेहल वढेराला ४.२० कोटी, ग्लेन मॅक्सवेलला ४.२० कोटी, हरप्रीत ब्रारला १.५० कोटी, विष्णू विनोदला ९५ लाख, विजय कुमार वैशाखला १.८० कोटी, यश ठाकूरला १.६० कोटी या खेळाडूंना आपल्या संघात घेतले.