IPL Media Rights: आयपीएलच्या एका सामन्याची किंमत 100 कोटी, सोनीने घेतले हक्क?
आयपीएलचे टेलिव्हिजन आणि डिजिटल अधिकार (IPL Media Rights) विकले गेले आहेत. पुढील 5 वर्षांसाठी तब्बल 43 हजार कोटीत हे हक्क विकले गेले आहे. सोनीने आयपीएल टीव्हीचे हक्क विकत घेतल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येत आहे. परंतु अधिकृत घोषणा अजून केले आहे. काहींच्या मते टीव्हीचे हक्क Sony ने पटकावले आहेत, तर डिजिटल प्लॅटफॉर्मचे हक्क मुकेश अंबानी यांच्या Viacom18 नेटवर्कने जिंकले आहेत.
2023 ते 2027 या पुढील पाच वर्षांसाठी इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मीडियाचे हक्क घेण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. यामध्ये ज्यामध्ये टीव्ही आणि डिजिटलचा समावेश आहे. 43 हजार 000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेला विकले गेले आहे. यामुळे प्रत्येक आयपीएल सामन्याचे मूल्य 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा आतापर्यंत विक्रम आहे. दिग्गज कंपनी अॅमेझॉनने यापूर्वी इंडियन प्रीमियर लीग मीडिया लिलावाच्या शर्यतीतून बाहेर पडली.
मागील पाच वर्षांसाठी 16 हजार कोटी
स्टार इंडियाने 2017-2022 या वर्षांसाठी 16 हजार 347.50 कोटी रुपयांत इंडियन प्रीमियर लीगचे अधिकार घेतली होती. त्याआधी सोनी पिक्चर्सकडे हे अधिकार होते. 2017 ते 2022 दरम्यना IPL च्या एका सामन्याची किंमत सुमारे 55 कोटी रुपये झाली होती.
सोनीने घेतले होते 8 हजार कोटीत
2008 मध्ये, सोनी पिक्चर्स नेटवर्कने 8 हजार 200 कोटी रुपयांच्या बोलीने 10 वर्षांच्या कालावधीसाठी आयपीएल मीडिया अधिकार जिंकले. तीन वर्षांच्या कालावधीसाठी आयपीएलचे जागतिक डिजिटल अधिकार नोव्ही डिजिटलला 2015 मध्ये 302.2 कोटी रुपयांना देण्यात आले.
दोन नवीन संघ
2022 च्या हंगामापासून गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा समावेश करून या वर्षी ही स्पर्धा आठ संघांवरून दहा संघांपर्यंत वाढवण्यात आली. गुजरात टायटन्सने गेल्या महिन्यात पहिल्या हंगामात ही स्पर्धा जिंकली होती.