IPL Retention 2025: चार कर्णधारांना धक्का, रोहित शर्मा मुंबईत कायम?
सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या आयपीएल रिटेंशनची यादी अखेर गुरुवारी संध्याकाळी जाहीर झाली. या यादीतून चार दिग्गज कर्णधारांना रिलीज केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आयपीएल चाहत्यांना धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सने इन फॉर्म ऋषभ पंतला रिलीज केलं आहे तर श्रेयस अय्यरलाही रिलीज करण्यात आलं आहे. केएल राहुलला फ्रेंचायझीने रिलीज केलं आहे. फाफ डु प्लेसिसला फ्रेंचायझीने सोडलं आहे. त्यामुळे या चारही संघासाठी नवे कर्णधार मिळणार आहे. तर रोहित शर्मा मुंबईत कायम राहणार की दुसऱ्या संघाकडून खेळणार, हा प्रश्न चाहत्यांना कित्येक दिवसांपासून सतावत होता. मुंबईने त्याला संघात कायम ठेवल आहे.
रिटेन झालेले खेळाडू
मुंबई : हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा.
गुजरात : शुभमन गिल, राशीद खान, साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया.
चेन्नई: ऋतुराज गायकवाड, मथिशा पथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी.
हैदराबाद : पॅट कमिन्स, हेन्रीक क्लासेन, TATA अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, नितीशकुमार रेड्डी.
बंगळुरु : विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.
दिल्ली : अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल.
कोलकाता : सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, हर्षित राणा, रमनदीप सिंग,
पंजाब: शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, राजस्थान : संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा लखनौ : निकोलस पूरन, मयांक यादव, रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मोहसीन खान.
सर्व संघांना जास्तीत जास्त ६ खेळाडूंना (५ कॅप आणि १ अनकॅप) रिटेन करता येणार होते. ६ पैकी ६ खेळाडू रिटेन केले, तर लिलावात राईट टू मॅच कार्ड संघांना वापरता येणार नाही, ६ पैकी जितके कमी खेळाडू ते रिटेन करतील, तितके राईट टू मॅच कार्ड फ्रँचायझींना लिलावात वापरता येणार आहेत.
आता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोनच संघांनी प्रत्येकी ६ खेळाडूंना संघात कायम केले आहे. तसेच सर्वात कमी दोनच खेळाडूंना पंजाब किंग्स संघाने रिटेन केले आहे.