IPL 2024 Schedule: आयपीएल 2024चे वेळापत्रक जाहीर; पहिला सामना कधी? जाणून घ्या

IPL 2024 Schedule: आयपीएल 2024चे वेळापत्रक जाहीर; पहिला सामना कधी? जाणून घ्या

आयपीएल 2024 च्या 21सामन्यांचे 17 व्या सीझनचं वेळापत्रक आज गुरुवारी जाहीर केलं आहे. या हंगामातील हा पहिला सामना 22 मार्चला चेपॉक एम ए चिंदबरम स्टेडीअमवर रंगणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आयपीएल 2024 च्या 21सामन्यांचे 17 व्या सीझनचं वेळापत्रक आज गुरुवारी जाहीर केलं आहे. या हंगामातील हा पहिला सामना 22 मार्चला चेपॉक एम ए चिंदबरम स्टेडीअमवर रंगणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये पहिली मॅच ही गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.चेन्नईची टीम नव्यांदा आयपीएलच्या ओपनिंगची मॅच खेळणार आहे.

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले होते की संपूर्ण स्पर्धा भारतातच आयोजित केली जाईल. केवळ 2009 मध्ये आयपीएल संपूर्णपणे परदेशात (दक्षिण आफ्रिका) खेळली गेली, तर 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमुळे, काही सामने UAE मध्ये खेळले गेले. तथापि 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुका असूनही ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती.

दिल्ली कॅपिटल्सचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल, त्यानंतर लगेचच आयपीएलसाठी मैदान तयार करण्यास वेळ लागेल. त्यामुळे दिल्लीचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. देशात यावर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. आता 17 दिवसांचा कार्यक्रम समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या या शेड्युल्डनुसार, दोन आठवड्यांच्या कालावधीत 10 शहरांमध्ये 21 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक टीम किमान तीन मॅचेस आणि जास्तीत जास्त पाच मॅसेच खेळणार आहे. पहिल्या वीकेंडमध्ये दोन डबल हेडर असतील ज्याची सुरुवात शनिवारी दुपारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होईल. त्यानंतर संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com