IPL 2024 Prize Money: चॅम्पियन संघाला किती कोटी मिळणार? हरणारा संघही होणार मालामाल, जाणून घ्या सविस्तर
IPL 2024 Prize Money : आयपीएल २०२४ चा फायनल सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आज चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार आहे. या फायनलमध्ये जो संघ विजयी होईल, त्या संघाला आकर्षक ट्रॉफी मिळणारच आहे, पण दुसरीकडे प्राईज मनीच्या माध्यमातून मोठी रक्कमही देण्यात येणार आहे. याशिवाय पराभूत झालेला संघही मालामाल होणार आहे. हैदराबादने याआधी एकदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. तर केकेआरने दोनवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारणार? हे आज रात्री स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, जाणून घेऊयात आयपीएल किताब जिंकणाऱ्या संघाला किती रक्कम मिळणार आहे.
चॅम्पियन झाल्यावर मालामाल होणार संघ
भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआयने) १७ व्या सीजनसाठी पुरस्कारांच्या मनी प्राईजमध्ये ४६.५ कोटी रुपये ठेवले आहेत. विजेत्या संघाला २० कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये दिले जातील. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहणाऱ्या संघाला अनुक्रमे ७ कोटी आणि ६.५ कोटी रुपये मिळणार आहेत.
पर्पल कॅप, ऑरेंज कॅप विजेत्याला किती रुपये मिळतील?
१४ सामन्यांमध्ये ७४१ धावा करणाऱ्या विराट कोहलीला ऑरेंज कॅप मिळेल. त्याला १५ लाख रुपये मिळू शकतात. तर पंजाब किंग्जच्या हर्षल पटेलला २४ विकेट्स घेतल्यामुळं पर्पल कॅप दिली जाईल. पटेलला १५ लाख रुपये मिळतील.
इमर्जिंग प्लेयरला किती रुपये मिळतील?
इमर्जिंग प्लेयरला २० लाख रुपये मिळतील. तर मोस्ट वॅल्यूएबल प्लेयरला १२ लाखांची रक्कम दिली जाईल.