हार्दिक पांड्या, केएल राहुलसहीत सर्वांवर बंदी येणार? ' या' सामन्यांसाठी होणार बॅन?
आयपीएल 2023चा सीझन जोरदार सुरु झाला आहे. मात्र पाच कर्णधारांवर बंदीची टांगती तलवार आहे. निर्धारीत वेळेत षटकं न टाकल्याने कर्णधारांना शिक्षा मिळाली आहे. या संघानी पुन्हा तीच तीच चूक केली तर संपूर्ण संघाला दंड ठोठावण्यात येईल आणि कर्णधाराला ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम वाढवून 24 लाख होईल. तर इतर खेळाडूंना सामन्याची 25 टक्के फी दंड म्हणून द्यावी लागणार आहे.
गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पंड्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन,मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव, लखनऊचा कर्णधार केएल राहुल यांना स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या चुकीनंतर पुन्हा या संघानी त्याच चुका दोन वेळा केल्यास थेट कर्णधारांवरच बॅन येणार आहे. तिसरी चूक झाल्यास कर्णधाराला 30 लाखाचा दंड आणि एका सामन्यासाठी बॅन लागू शकतो.