IPL 2022
IPL 2022Team Lokshahi

IPL 2022 : आयपीएलच्या अंतिम सामन्याची जोरदार तयारी, पंतप्रधान नरेंद्र मोदीही राहणार उपस्थित

अंतिम सामना हा 29 मेला अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Published by :
shamal ghanekar
Published on

IPL 2022: आयपीएल 2022 ही स्पर्धा आता काही दिवसात संपणार आहे. आज 2 क्वॉलीफायर सामना होणार आहे. हा सामना राजस्थान (Rajasthan Royals) विरूद्ध बंगळुरू (Royal Challengers Bangalore) असा होणार आहे. या दोन्ही टीममधून जी टीम जिंकेल ती गुजरातविरूद्ध फायनल खेळणार आहे. अंतिम सामना हा 29 मेला अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

आयपीएल 2022 स्पर्धाचा अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळणार असून हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित राहणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) तब्बल 6 हजार पोलिस तैन्यात करण्यात आले आहेत. अर्धा तास आधी म्हणजे 7.30 वाजता नाणेफेक होईल, आणि अंतिम सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.

IPL 2022
GT Vs CSK | मिलरची तुफानी खेळी; गुजरात चेन्नईवर 'सुपर' विजय

आज झालेल्या बैठकीत समारोप कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आयपीएलच्या फायनल सामन्याआधी समारोप कार्यक्रम आयोजत केले जाणार आहे. 29 मेला क्लोजिंग समारोप सायंकाळी साडेसाहा वाजता सुरु होणार असून हा कार्यक्रम 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. यावेळी बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक दिग्गज कलाकारांचा उपस्थित असणार आहे. यासाठी जोरदार तयारीही सुरू आहे. 29 मेला होणाऱ्या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमीही खूप आतुरतेने अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत.

IPL 2022
LSG vs MI : वानखेडेवर मुंबईची हार; लखनौचा दमदार विजय
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com