IPL 2022 Final : गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय
गुजरात टायटन्स (GT) ने त्यांचा पहिला सीजन खेळत IPL 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. या कमी धावसंख्येच्या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 विकेट राखून पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला राजस्थानने (Rajasthan Royals) टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना गुजरातला विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातने हे लक्ष्य ३ विकेट गमावून सहज गाठले. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) IPL मध्ये पहिला सीजन खेळत IPL चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने अत्यंत सोपी फलंदाजी (Batting) केली, तर गुजरातच्या गोलंदाजांनी शानदार खेळ दाखवला. टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या राजस्थानने पहिल्या 6 षटकात 44 धावा जोडल्या. वेगवान धावा करण्याच्या नादात यशस्वी जैस्वाल 16 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. राजस्थानकडून या सामन्यात जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या. संजू सॅमसंग (Sanju Samsung) 14, देवदत्त पडिकल 2, सिमरन हेटमायरने 11 धावा केल्या आणि हे दिग्गज फलंदाज अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत.
दुसरीकडे, गुजरातने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) केवळ चेंडूच नव्हे तर बॅटनेही चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या चार षटकांत 17 धावांत तीन विकेट घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली, तर साई किशोरला दोन विकेट मिळाले. याशिवाय राशिद खान, यश दयाल आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पॉवर प्लेमध्येच राजस्थानने ऋद्धिमान साहा 5 आणि मॅथ्यू वेड 8 यांना बाद करून सामना बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला, पण यानंतर हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी करत गुजरातला सामन्यात पुढे केले. हार्दिकने 34 धावा केल्या आणि शेवटी शुभमन गिलने गुजरातला विजयी षटकार ठोकून सामना संपवला.
गुजरात टायटन्स प्रथमच IPL 2022 मध्ये खेळत होते आणि या संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करून शानदार कामगिरी केली आणि पहिल्याच सत्रात IPL चे विजेतेपद पटकावले. 2022 च्या मेगा लिलावानंतर क्रिकेटपंडित गुजरातला अतिशय सामान्य संघ मानत होते. पण गुजरातने आयपीएलचे जेतेपद पटकावत सर्वांनाच चुकीचे सिद्ध केले.