ऑलिम्पिकमध्ये तब्बल 128 वर्षांनी क्रिकेटची ग्रँड एंट्री; बोर्डानं दिली मान्यता

ऑलिम्पिकमध्ये तब्बल 128 वर्षांनी क्रिकेटची ग्रँड एंट्री; बोर्डानं दिली मान्यता

आशियाई क्रीडा स्पर्धेतही प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, यामध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले होते.
Published on

मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती बोर्डाने ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. यानुसार, लॉस एंजेलिस येथे 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश केला जाईल. क्रिकेटच्या 128 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा क्रिकेटचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी, नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, यामध्ये भारताने सुवर्णपदक पटकावले होते.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये अध्यक्ष थॉमस बाख यांनी 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा केली. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळांच्या आयोजकांनी त्यांना क्रिकेट, ध्वज फुटबॉल, लॅक्रोस, स्क्वॅश आणि बेसबॉल-सॉफ्टबॉल या स्पर्धांचा समावेश करण्याची मागणी केली होती.

नियमांनुसार, कोणताही यजमान देश काही क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्याची मागणी करू शकतो. या नियमात क्रिकेटचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती, त्याला बोर्डाने मान्यता दिली आहे. म्हणजेच २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट देखील सहभागी होणार आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे बोर्ड अधिवेशन भारतात आयोजित केले जात आहे. त्याचे उद्घाटन 14 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी करणार आहेत. समितीचे हे 141 वे अधिवेशन असेल. या काळात ऑलिम्पिक खेळांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. सुमारे 40 वर्षानंतर हे अधिवेशन आयोजित केले जात आहे. यापूर्वी 1983 मध्ये भारतात याचे आयोजन करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com