इंडोनिशिया सरकारचा मोठा निर्णय! चेंगराचेंगरीला जबाबदार असणाऱ्यांवर होणार कारवाई

इंडोनिशिया सरकारचा मोठा निर्णय! चेंगराचेंगरीला जबाबदार असणाऱ्यांवर होणार कारवाई

इंडोनिशियाचे मुख्य सुरक्षमंत्र्यांनी दिली माहिती
Published by :
Sagar Pradhan
Published on

इंडोनिशियाच्या मलंग शहरातील एका मोठ्या स्टेडियममध्ये अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यात फुटबॉल सामना रंगला होता. या इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार उफाळला. यामध्ये 127 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले होते. फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत इंडोनेशिया सरकारनं मोठा निर्णय घेण्यात आला आहे. घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्याचे आदेश इंडोनेशिया सरकारकडून देण्यात आले आहे.

इंडोनिशिया सरकारचा मोठा निर्णय! चेंगराचेंगरीला जबाबदार असणाऱ्यांवर होणार कारवाई
विराटचं देशप्रेम; पाहा व्हिडिओ

इंडोनिशियाचे मुख्य सुरक्षमंत्री काय म्हणाले?

इंडोनिशियाचे मुख्य सुरक्षमंत्री महफूद एमडीनं सांगितलंय की, "आम्ही राष्ट्रीय पोलिसांची चर्चा केली. तसेचया घटनेतील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत."

नेमकं काय घडलं होत?

पर्स्बाया सुराबाया आणि अरेमा एफसी यांच्यातील सामना इंडोनेशियाच्या पूर्व जावा येथील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात अरेमा एफसी संघाचा पराभव झाला. संघाच्या पराभवानंतर संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसून हाणामारी सुरू केली. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार उफाळला होता. यामध्ये 127 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. ही आजपर्यंत फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठी आपत्ती होती. फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती मिळताच पोलीस आणि इंडोनेशियन नॅशनल आर्म्ड फोर्सचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि खेळाडूंना सुरक्षितपणे मैदानाबाहेर काढले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com