Tokyo 2020 : भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाचा राजीनामा
भारतीय महिला हॉकी संघाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सेमीफायलनपर्यंत धडक मारली. पण सेमीफायनलमध्ये तगड्या अर्जेंटीना संघाकडून आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत ग्रेट ब्रिटनकडून 4-3 ने पराभव मिळाल्यामुळे भारतीय महिलांचे पदक मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. या पराभवानंतर महिला संघाचा प्रशिक्षक श्योर्ड मरीन्ये याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला.त्याने हा राजीनामा संघाचा पराभव झाला म्हणून दिला नसून कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी दिला असल्याचे सांगितले.
ऑलिम्पिकमध्ये मरिन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला हॉकी संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. सामन्यानंतर मरिन म्हणाले, "सध्या माझी कोणतीही योजना नाही, कारण हा माझा भारतीय महिला संघासोबतचा शेवटचा सामना होता." मरिन आणि संघाचे विश्लेषणात्मक प्रशिक्षक जनेका शॉपमन दोघांनाही भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) मुदतवाढीची ऑफर दिली होती, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी ही ऑफर नारकाली.
शोर्ड मरिन हे मूळचे नेदरलँड्सचे आहेत. शोर्ड हे २००३ पासून वेगवेगळ्या संघांना हॉकीचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांना कोच म्हणून १८ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. मागील तीन वर्षांपासून म्हणजेच २०१८ च्या मध्यापासून ते भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक आहेत. २०१७ ते २०१८ दरम्यान शोर्ड मरिन हे भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक होते.