Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा डंका! भारतानं 'बॅक टू बॅक' जिंकली पदकं
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारतीय संघासाठी रविवारचा दिवस चांगला होता. भारताला दोन रौप्यपदके मिळाली आहेत. आशियाई खेळांमध्ये भारतातून एकूण 655 खेळाडू सहभागी होत आहेत, जे आतापर्यंत देशातील सर्वात मोठे संघ आहे. एकूण 40 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आव्हान देतील.
महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीत भारतानं रौप्यपदक मिळवलं. दुसरे रौप्य पदक स्कलमध्ये मिळवलं. या स्पर्धेत लाइटवेट कॅटेगरीमध्ये भारतीय पुरुषांनी बाजी मारली.
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळाले. मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतासाठी हे पदक जिंकले. त्यानंतर रोइंगमध्येही भारताने रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. भारतीय महिला क्रिकेट संघानेही अंतिम फेरी गाठली आहे. नंतर रमिताने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले.
आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये नेमबाजीनं भारताची मेडल टॅलीचं खातं उघडलं. भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिघांनी मिळून १८८६ गुण मिळवले. यामध्ये रमितानं ६३१.९ गुण, मेहुलीनं ६३०.८ तर आशीनं ६२३.३ गुण मिळवले.
नेमबाजीत रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या काही वेळातच भारताला डबल्स स्कलमध्ये विजय साजरा करण्याची आणखी एक संधी मिळाली. पुरुषांच्या लाइटवेट कॅटेगरीमध्ये भारताच्या अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी ६:२८:१८ अशा वेळेसह रौप्यपदकाची कमाई केली. तर चीननं सुवर्ण पदकाची कमाई केली.
भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत
10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य
पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य
पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग): कांस्य
पुरुष कॉक्सड 8 संघ (रोइंग): रौप्य
महिला 10 मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य