IND Vs ZIM : झिम्बाब्वेवर भारताचा दणदणीत विजय, आता सेमीफायनलमध्ये देणार 'या' संघाला आवाहन
भारत आणि झिम्बाब्वे या दोन संघात आज टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. या सामन्याकडे आज संपूर्ण भारतीय क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून होते. याच सामन्यात भारताने झिम्बाब्वे विरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने आज सुपर 12 राऊंडमधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेवर विजय मिळवला. या विजयासह भारताने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ ग्रुपमध्ये टॉपवर आहे.
भारताने पहिल्यांदा नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सूर्यकुमार यादवन 25 चेंडू नाबाद 61 आणि केएल राहुल 51 यांच्या बळावर भारताने 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 186 धावा केल्या. या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ मैदानावर उतरला मात्र त्यांचा डाव 115 धावात आटोपला.
सेमीफायनलमध्ये भारताचा सामना या संघासोबत असणार?
भारताचा या विजयासह वर्ल्ड कप मधील सेमीफायनलमध्ये खेळणाऱ्या चार टीम्स निश्चित झाल्या आहेत. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड तर ग्रुप 2 मधून भारत आणि पाकिस्तान या दोन टीम्स टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाल्या आहेत. ग्रुप 1 मधील टॉप टीम ग्रुप 2 मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर आणि ग्रुप 2 मधील टॉप टीम ग्रुप 1 मधील दुसऱ्या स्थानावरील टीम बरोबर खेळणार आहे. म्हणजे टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध तर पाकिस्तान न्यूझीलंडला भिडणार आहे.