आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरत भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
भारताने चमकदार कामगिरी करत आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. भारत आठव्यांदा आशिया कपचा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात भारतासमोर विजयासाठी 51 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी अवघ्या 6.1 षटकात पूर्ण केले.
टीम इंडियाने श्रीलंकेला 50 रन्सवर ऑल आऊट केले. मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. हार्दिक पांड्याने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. त्याने 5 षटकात 23 धावा दिल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. हेमंताने 13 धावा केल्या. 15 ओव्हरमध्ये श्रीलंकेने 50 धावाचं करता आल्या. यामुळे भारताच्या विजयाच्या मार्ग सोप्पा झाला आहे.
तर, श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्यांचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि ईशान किशन मैदानात उतरले होते. शुभमन गिलने नाबाद 27 रन केले. आणि ईशानने नाबाद 23 रन बनविले आहेत.