Ind Vs Eng 4th Test | भारताचा १५७ धावांनी ऐतिहासिक विजय; मालिकेतील २-१ ने आघाडी
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने १५७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांचा दमदार कामगिरीने इंग्लंडच्या हातून हा विजय खेचून आणला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
शेवटच्या दिवशी इंग्लंडला २९१ धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २१० धावा करू शकला. जसप्रीत बुमराहने २, रवींद्र जडेजाने २, शार्दुल ठाकूरने २, तर उमेश यादवने २गडी बाद केला. इंग्लंडकडून हसीब हमीदने ६३, तर बर्न्सने ५० धावांची खेळी केली. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त १ सामन्यात विजय मिळवला होता. या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवाल होता.