India vs Pakistan latest News Update
India vs Pakistan Google

IND W vs PAK W : टीम इंडिया पाकिस्तानचा उडवणार धुव्वा; आशिया चषक २०२४ मध्ये रंगणार महामुकाबला, 'अशी' असेल प्लेईंग ११

१९ जुलैपासून वुमन्स एशिया कप २०२४ चा थरार रंगणार आहे. या आशिया चषकाचं यजमानपद श्रीलंकेला मिळालं असून या टूर्नामेंटमध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत.
Published by :
Naresh Shende
Published on

Women Asia Cup 2024 India Predicted Playing 11: १९ जुलैपासून वुमन्स एशिया कप २०२४ चा थरार रंगणार आहे. या आशिया चषकाचं यजमानपद श्रीलंकेला मिळालं असून या टूर्नामेंटमध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. सातवेळा चॅम्पियन्स राहिलेला भारतीय महिला क्रिकेटचा संघ पाकिस्तान विरोधात पहिला सामना खेळणार आहे. हा महामुकाबला १९ जुलैला होणार असून भारतीय संघ पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय महिला संघाच्या प्लेईंग ११ मध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश होऊ शकतो, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

भारतीय स्क्वॉडमध्ये जबरदस्त खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ११ खेळाडू निवडणं संघ व्यवस्थापनासाठी आव्हानात्मक असणार आहे. अशातच भारताची संभाव्य प्लेईंग ११ जाहीर करण्यात आली आहे.

शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाची धमाकेदार सलामी

मागील काही दिवसांपासून टीम इंडियासाठी सलामीला स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मानं चमकदार कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात या दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. अशातच पाकिस्तानच्या विरोधात होणाऱ्या सामन्यातही या मंधाना आणि शेफालीला सलामीला पाठवण्याची शक्यता आहे.

जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौरसोबत रिचा घोषवर मोठी जबाबदारी

मध्यमक्रममध्ये टीम इंडियासाठी जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत. दोन्ही खेळाडूंनी दिर्घकाळापासून टीम इंडियासाठी मधल्या फळीत चांगली कामगिरी केली असून त्या जबरदस्त फॉर्ममध्येही आहेत. तर अंतिम षटकांमध्ये रिचा घोष महत्त्वाची भूमिका बजावू शकते. इनिंग आक्रमकपणे फिनिश करण्याची क्षमता रिचा घोषकडे आहे.

राधा यादव, दिप्ती शर्मा आणि रेणुका ठाकूर घेणार विकेट्स?

भारतीय गोलंदाजीत दिप्ती शर्मा, राधा यादव आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर टीम इंडियासाठी महत्त्वाच्या गोलंदाज ठरू शकतात. या तिन्ही खेळाडूंनी टीम इंडियासाठी उत्तम कामगिरी केली आहे. या सामन्यातही या गोलंदाजांना विकेट्स घेण्यात यश मिळले, अशी आशा आहे. त्यांच्यासोबत पूजा वस्त्रकर आणि श्रेयंका पाटील यांच्यावरही गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.

पाकिस्तान विरोधात होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ११

स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दिप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्रकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, रेणुका सिंह ठाकूर आणि राधा यादव.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com