T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढण्यासाठी भारतीय संघ सज्ज; कोण मारणार बाजी?
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत संघ नेदरलँडवर मात केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सुपर-12 मधील हा सामना आज म्हणजे रविवारी (30 ऑक्टोबर) पर्थ स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी 4.30 वा. सुरू होईल. यावेळी कोणत्या संघाचे पारडं जड होणार याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा महामुकाबला होणार असून यावेळी भारतीय संघ जोरदार तयारी सुरू आहे. हा सामना जर भारतीय संघाने जिंकला तर थेट सेमिफायनलमध्ये पोहचेल. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये केएल राहुलला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या सामन्यात तो कॅप्टन रोहित शर्मासोबत ओपनिंग करणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 23 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळण्यात आले असून यामधील 13 सामने भारतीय संघानं जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेनं 9 सामने जिंकले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यातील 23 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमधील एक सामना अनिर्णित ठरला आहे. तसेच टी-20 विश्वचषकापूर्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्याची टी-20 सामन्यांमध्येही विजय मिळवला आहे.
टी-20 विश्वचषक 2022 मधील दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत:
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रीसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी/लुंगी एनगिडी/मार्को जॅनसेन.