क्रीडा
चक दे इंडिया… मेरी कोम आणि मनप्रितच्या हातात तिरंगा!
जपानमध्ये २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. राजधानी टोकीयोमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेत सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले.
भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले. १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे.
टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.