Shubhman Gill: भारतीय क्रिकेट खेळाडू शुभमन गिल ठरला 'स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर'

Shubhman Gill: भारतीय क्रिकेट खेळाडू शुभमन गिल ठरला 'स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर'

Indian Cricketer Shubhman Gill: भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिललला 19 व्या सीएनबीसी - टीव्ही 18 ने स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर चा पुरस्कार दिला.
Published by :
Team Lokshahi
Published on

Shubhman Gill Sports Leader Of The Year: भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिललला 19 व्या सीएनबीसी - टीव्ही 18 ने स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर चा पुरस्कार दिला. 2 डिसेंबर रोजी मुंबईत आयोजित 'इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स' (IBLA) च्या 19 व्या सीएनबीसी - टीव्ही 18 ने भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल याला प्रतिष्ठित "स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 19 व्या इंडिया बिजनेस लीडर (IBLA) पुरस्कार वितरण सोहळा हा आज मुंबईत झाला.

गिलला मिळालेल्या या पुरस्कारामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उगवता तारा आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. पंजाबच्या फाझिलका येथून येणाऱ्या गिलचा प्रवास हा भारताच्या 19 वर्षाखालील संघापासून सुरू होता. गिलला मिळालेल्या या पुरस्कारामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उगवता तारा आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

शुभमन गिलने 2019 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध हेमिल्टन येथे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते. त्यानंतर वर्षभराने त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेही ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटीत त्याने पदार्पण केलं. वयाच्या 24 व्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा शुभमन गिल या फॉरमॅटमध्ये द्विशतक ठोकणारा सर्वात तरूण फलंदाज ठरला आहे. याचबरोबर वनडेमध्ये सर्वात वेगाने 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. तो आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहचला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com