MS Dhoni | BCCI
MS Dhoni | BCCI team lokshahi

CSK चा धोनी प्लॅन फसला, BCCI ने जारी केला धक्कादायक निर्णय

आयपीएल मालकांनी संघ केले खरेदी
Published by :
Shubham Tate
Published on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या खेळाडूंसाठी एक संदेश जारी केला आहे. बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की, कोणताही भारतीय खेळाडू, मग तो करारबद्ध असो वा निवृत्त असो आणि आयपीएल खेळत असो, दक्षिण आफ्रिकेतील आगामी T20 लीग आणि UAE मधील T20 लीगमध्ये सहभागी होणार नाही. (indian can play or mentor in foreign t20 leagues bcci make big statement)

आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडूही या परदेशी लीगमध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकणार नाहीत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

चेन्नई सुपर किंग्ज लिमिटेड आपला आयकॉन खेळाडू महेंद्रसिंग धोनीचा दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीगमध्ये मार्गदर्शक म्हणून वापर करू शकत नाही कारण तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत आहे.

MS Dhoni | BCCI
CM शिंदेंविरोधात संजय पवार आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात

निवृत्त होणे आवश्यक आहे

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हे स्पष्ट आहे की, देशांतर्गत क्रिकेटपटूंसह कोणताही भारतीय खेळाडू खेळाच्या सर्व प्रकारातून निवृत्त होईपर्यंत इतर लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही. एखाद्या खेळाडूला आगामी लीगमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्याला बीसीसीआयशी पूर्णपणे संबंध तोडावे लागतील.

धोनीसारखा खेळाडू या लीगमध्ये मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक म्हणून भाग घेऊ शकतो का, असे विचारले असता? यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, "मग तो चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळू शकत नाही. त्याला आधी निवृत्ती घ्यावी लागेल."

MS Dhoni | BCCI
शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार, 'या' खासदारांची नावं चर्चेत

आयपीएल मालकांनी संघ खरेदी केले

दक्षिण आफ्रिका स्वतःची T20 लीग घेऊन येत आहे आणि लीगच्या सहा फ्रँचायझी त्याच लोकांच्या मालकीच्या आहेत ज्यांच्याकडे IPL संघ आहेत. मुंबई, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि दिल्ली फ्रँचायझींनी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत. त्याचप्रमाणे UAE मध्ये होणाऱ्या T20 लीगमध्ये सहा पैकी पाच फ्रँचायझी भारताच्या मालकीच्या आहेत. यापैकी तीन संघ आयपीएलमध्ये आहेत आणि या दिल्ली, मुंबई, कोलकाता फ्रँचायझी आहेत.

बीसीसीआयचे नियम कडक

बीसीसीआयने परदेशी टी-२० लीगमध्ये भारतीय खेळाडूंच्या सहभागाबाबत अतिशय कठोर नियम केले आहेत. आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सने कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्येही संघ खरेदी केले आहेत. 2019 मध्ये, दिनेश कार्तिक, कोलकाता फ्रँचायझीचा भाग, CPL मध्ये त्रिनबागो नाईट रायडर्सच्या ड्रेसिंग रूममध्ये संघाच्या जर्सीमध्ये बसून सामना पाहत होता. यानंतर बीसीसीआयने कार्तिकवर नाराजी व्यक्त केली आणि कार्तिकला लेखी माफी मागावी लागली. कार्तिकने माफीनाम्यात सांगितले होते की, केकेआरचे नवे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या आवाहनावरून तो ड्रेसिंग रूममध्ये गेला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com