IND VS NEP: भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

IND VS NEP: भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

IND vs NEP: आशिया कप 2023 चा पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल तर कर्णधार रोहित शर्माला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करावे लागतील.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरोधात प्रथम फलंदाजी केल्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे राहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले. पाकिस्तानविरोधात इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी केली, असे म्हणत रोहित शर्मा याने कौतुक केले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह कौटंबिक कारणामुळे मायदेशात परतला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. दरम्यान, नेपाळचा कर्णधार रोहित यानेही प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा असल्याचे नाणेफेक गमावल्यानंतर सांगितले. त्याशिवाय नेपाळसाठी आजचा दिवस सर्वात मोठा असल्याचेही सांगितले. नेपाळच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे.

पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला.त्यामुळे भारताला एका गुणांवर समाधान मानावे लागले. आता आशिया चषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला नेपाळविरोधात विजय गरजेचा आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ दोन गुणांसह सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.

पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com