IND Vs AFG T20 : भारताने जिंकला सुपर ओव्हरचा थरार; भारताचा 3-0 ने दणदणीत विजय
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील शेवटचा टी-20 सामना आज बंगळुरूत खेळला गेला. हा सामना अतिशय रोमांचक झाला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 212 धावा केल्या. यानंतर अफगाण संघानेही 6 गडी गमावून 212 धावा केल्या, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळल्या गेल्या. पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली.
भारतीय टीम आणि अफगाणिस्तानमध्ये बेंगळुरूत अतिशय रोमांचक मॅच खेळली गेली. पहिल्यांदा दोन्ही टीममध्ये मॅच टाय झाली. यानंतर दोन्ही टीमला सुपर ओव्हरमध्ये 16-16 रन्स करता आले आणि सुपर ओव्हरही टाय झाली. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने कडवी झुंज देत भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम टीम इंडियाने 5 बॉल्समध्ये 11 रन्स केले होते. यानंतर कॅप्टन रोहित शर्माने स्पिनर रवी बिश्नोईच्या हाती बॉल सोपविला. त्यानंतर बिश्नोईने आपल्या स्पिनची कमाल दाखविली आणि अफगाणिस्तानला 3 बॉल्समध्ये 1 रन दिला. बिश्नोईने 1-1 विकेट घेतला त्यानंतर 1 रन दिले पुन्हा तिलऱ्या चेंडूवर 1-2 विकेट घेतला. बिश्नोईने मोहम्मद नबी आणि रहमनुल्लाह गुरबाजला लक्ष्य केले.
दरम्यान, या सामन्यात 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघानेही 6 बाद 212 धावाच केल्या. यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी संघासाठी 50-50 धावा केल्या. तर मोहम्मद नबीने 16 चेंडूत 34 आणि गुलबदीन नायबने 23 चेंडूत 55 धावा केल्या. भारतीय संघाकडून फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर आवेश खान आणि कुलदीप यादवने 1-1 विकेट घेतली. या विजयासोबतच टीम इंडियाने अफगाणिस्तानला 3 मॅचच्या T20 सीरीजमध्ये 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माने रेकॉर्ड शतक लगावत धमालच केली. सोबतच रिंकू सिंहनेही लगेचच 50 रन्स केले.