भारताचा 8 धावांनी विजय
भारताने इंग्लडवर 8 धावांनी विजय मिळवला आहे. शार्दुलने 3 तर हार्दिक पंड्या आणि चहर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. आता पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारत – इंग्लंड 2-2 ने बरोबरीत आहेत.तर आता शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.
भारताने इंग्लंडसमोर 186 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चागली झाली. जोस बटलरने 9 धावा, डेव्डिह मलान 14 धावांवर दांडी गुल झाली. तर जेसन रॉयने 40 धावा केल्या. दरम्यान शार्दूल ठाकूरच्या एकाच ओव्हरमध्ये बेयरस्टो आणि कर्णधार मॉर्गन या दोन मोठ्या विकेट्स मिळाल्यामुळे मॅच भारताच्या बाजूने झुकली. बेयरस्टो 25, मॉर्गन 4 धावावर बाद झाला. बेन स्टोक्सच्या खेळीने भारताची चिंता वाढली होती.मात्र तोही 46 वर बाद झाला. सॅम कुर्रनने 3 तर ख्रिस जॉर्डन 12 धावा केल्या. जोफ्रा आर्चर 18 वर नाबाद राहिला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा 12 धावावर बाद झाला. त्यामुळे रोहितच्या रुपात भारताला पहिला धाक बसला. त्यानंतर के.एल.राहुल पुन्हा एकदा निराशा केली. 14 धावावर तो बाद झाला. विराट कोहली सुद्धा 1 धाव काढून माघारी गेला. त्यांनंतर उतरलेल्या सूर्यकुमार यादवने डाव साभाळत 57 धावा केल्या. ॠिषभ पंत 30 धावावर बाद झाला. श्रेयस अय्यरने सुद्धा 37 धावा कुटल्या. हार्दिक पांड्याने 11, वॉशिंग्टन सुंदर 4 वर बाद झाला. तर शार्दुल ठाकूरने नाबाद 10 धावा केल्या. या जोरावर भारताने 6 गडी गमावून 185 धावापर्यत मजल मारली आहे.
दरम्यान आता पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारत – इंग्लंड 2-2 ने बरोबरीत आहेत.तर आता शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.