पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी
भारताने T-20 मालिकेत श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर आजपासून भारत विरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. आजच्या पहिल्याच सामन्यात भारताने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. श्रीलंकाविरुद्धचा हा पहिला एकदिवसीय सामना 67 धावांनी जिंकला आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 373 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ आठ गडी गमावून केवळ 306 धावा करू शकला आणि 67 धावांनी सामना गमावला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सुरुवात केली. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी भारताने ६७ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 373/7 अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 42 षटकांत 8 गडी गमावून 306 धावाच करू शकला. कर्णधार दासुन शनाकाने नाबाद शतक ठोकले. भारताकडून उमरान मल्कीने तीन बळी घेतले. मोहम्मद सिराजने दोन बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.