IND vs ZIM 5th T20I: भारताने पाचवा टी-20 सामना जिंकला; झिम्बाब्वेचा 42 धावांनी केला पराभव

IND vs ZIM 5th T20I: भारताने पाचवा टी-20 सामना जिंकला; झिम्बाब्वेचा 42 धावांनी केला पराभव

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हरारे येथे खेळवला गेला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हरारे येथे खेळवला गेला. पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली आहे.

पाचव्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 58 धावांची खेळी खेळली. झिम्बाब्वेकडून आशीर्वाद मुझाराबानीने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 18.3 षटकांत केवळ 125 धावा करून अपयशी ठरला. झिम्बाब्वेकडून डिओन मायर्सने सर्वाधिक 34 धावा केल्या. टीम इंडियासाठी मुकेश कुमारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

या विजयासह टीम इंडियाने 5 सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकली. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात केवळ 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर संघाने जबरदस्त पुनरागमन करत पुढील सलग 4 सामने जिंकले. या मालिकेत भारतासाठी सर्वात यशस्वी फलंदाज कर्णधार शुभमन गिल राहिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com