IND vs SL ODI 2: भारत आणि श्रीलंका वनडे सीरिज 2 सामन्याला आजपासून सुरुवात
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून म्हणजेच 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ज्यामध्ये मालिकेतील पहिला सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 2:30 वाजता सुरु होईल. वनडे सीरिजसाठी अनेक अनुभवी खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही मालिका खेळणार आहे.
चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची तयारी लक्षात घेता ही मालिका टीम इंडिया आणि टीम श्रीलंका या दोघांसाठी खूप महत्त्वाची आहे. या सामन्यामध्ये स्टार फलंदाज विराट कोहलीही संघाचा एक भाग असणार आहे. याशिवाय एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणारे केएल राहूल आणि श्रेयस अय्यर डिसेंबर 2023 नंतर निळ्या जर्सीत दिसणार आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 168 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने यापैकी 99 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला 57 सामन्यात यश आलं आहे.
दोन्ही संघात 20 एकदिवसीय मालिका झाल्या आहेत. त्यापैकी 15 मालिका भारताने जिंकल्या आहेत. टीम इंडियाने भारतात 10 आणि श्रीलंकेत 5 मालिका जिंकल्या आहेत. तर श्रीलंकेला फक्त 2 मालिकांमध्येच यश आलं आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि हर्षित राणा.
टीम श्रीलंका
चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणा, चमिका करुणा, मोहम्मद शिराज मेंडिस, निशान मधुष्का आणि एशान मलिंगा.