India vs South Africa 1st Test, DAY 3 | तिसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला; भारताकडे 146 धावांची आघाडी

India vs South Africa 1st Test, DAY 3 | तिसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला; भारताकडे 146 धावांची आघाडी

Published by :
Published on

भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताकडे एकूण 146 धावांची आघाडी आहे. दिवसअखेर मयांक अग्रवालच्या विकेटच्या मोबदल्यात भारताच्या एक बाद 16 धावा झाल्या आहेत. पहिल्या डावात दमदार सलामी देऊन अर्धशतक झळकावणारा मयांक अग्रवाल दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाला आहे. त्याला चार धावांवर जॅनसेनने डी कॉक करवी झेलबाद केले.

काल दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर आज तिसऱ्या दिवसाच्या खेळावर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. आज संपूर्ण दिवसात दोन्ही संघाच्या मिळून 18 विकेट गेल्या. भारताने पहिल्या दिवसाच्या तीन बाद 273 धावांवरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर आज फक्त 54 धावांची भर घालून भारताचा डाव 327 धावात आटोपला. निगीडी आणि राबाडा दोघांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. दोघांनी मिळून नऊ विकेट घेतल्या.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डावाला सुरूवात झाली आहे. सुरूवातीलाच कर्णधार डीन एल्गरच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका बसला आहे. कर्णधार एल्गर तंबूत परतल्यानंतर एडेन मार्कराम (9) आणि कीगन पीटरसन (11) आता खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद 21 धावा झाल्या आहेत.

पहिल्या दिवशी 3 गड्यांच्या बदल्यात 272 धावा केलेला भारताचा पहिला डाव 327 धावात आटोपला. शतकवीर केएल राहुल (123) माघारी परतला. कगिसो रबाडाने त्याला यष्टीरक्षक क्विंटन डीकॉककरवी झेलबाद केलं.जसप्रीत बुमराह 14 धावांवर बाद, पंत 8 आणि अश्विन 4 धावांवर आऊट.मोहम्मद शामी आठ धावांवर बाद झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाली असून कर्णधार डीन एल्गरच्या रुपाने त्यांना पहिला झटका बसला आहे. एल्गरला अवघ्या एक रन्सवर बुमराहने विकेटकिपर पंतकरवी झेलबाद केले.मार्कराम-पीटरसन खेळपट्टीवर स्थिरावले आहेत. एडेन मार्कराम (9) आणि कीगन पीटरसन (11) आता खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद 21 धावा झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com