भारताचा विजय, दक्षिण आफ्रिका 16 धावांनी पराभूत

भारताचा विजय, दक्षिण आफ्रिका 16 धावांनी पराभूत

गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २३७ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ३ बाद २२१ धावांवर मर्यादित राहिला. डेव्हिड मिलर (४७ चेंडूंत नाबाद १०६) आणि क्विंटन डीकॉक (४८ चेंडूंत नाबाद ६९) यांचे प्रयत्न अपयशी ठरले.

भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. टी-20 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. सूर्यकुमार यादव (२२ चेंडूंत ६१ धावा) आणि केएल राहुलच्या (२८ चेंडूंत ५७) फटकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी मात केली.

भारताचा विजय, दक्षिण आफ्रिका 16 धावांनी पराभूत
ICC T20 रँकिंग: सूर्या T20 क्रमवारीत हिरो, पाकिस्तानच्या कर्णधाराला टाकले मागे

यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार व विराट कोहली यांनी ४३ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी केली. कोहलीने २८ चेंडूंत सात नाबाद ४९ धावा केल्या.

भारताचा विजय, दक्षिण आफ्रिका 16 धावांनी पराभूत
सुप्रीम कोर्टात BCCI च्या याचिकेवर आज होणार सुनावणी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com