दीड महिन्याआधीच भारत वि. पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याचे तिकीट काही मिनिटांत हाऊसफुल
नुकताच आशिया चषक 2022 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारत विरूध्द पाकिस्तान असे दोन सामने दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळाले. या नंतर पुढील टी-20 विश्वचषकात हा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आगामी टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 23 ऑक्टोबरला खेळला जाणार. या सामन्यासाठी दोन्ही देशांसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळत आहे. दीड महिन्यांचा काळ असताना आता पासून तिकीटची विक्री चालू आहे. काही मिनिटात तिकीट विकले गेले आहेत.
टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान त्यांच्या पहिल्या सुपर 12 सामन्यात आमने-सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकीटाला सुरुवात होताच काही मिनिटांतच सर्व तिकिटं विकली गेली आहेत. आयसीसीच्या (ICC) प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आलीय.
5 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री
टी-20 विश्वचषकाची आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उस्तुकता पाहायला मिळत आहे. "या सामन्यांच्या दीड महिन्याआधी आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झालीय. दरम्यान, 16 आंतरराष्ट्रीय संघातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी 82 देशांतील क्रिकेटप्रेमींनी तिकीटं विकत घेतली आहेत", अशीही माहिती आयसीसीनं दिलीय.