IND vs PAK: कोण जिंकणार महामुकाबला? भारत की पाकिस्तान? जगातील १० दिग्गजांनी केली भविष्यवाणी, म्हणाले...
India vs Pakistan, T20 World Cup 2024 : टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात आज सायंकाळी महामुकाबला रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी जगातील तमाम क्रीक्रेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा बहुप्रतीक्षित सामना आज ९ जूनला न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना कोणता संघ जिंकणार? हा प्रश्न सर्वच चाहत्यांना पडला आहे. अशातच जगातील दिग्गज क्रिकेटपटूंनी या सामन्याबाबत भविष्यवाणी केली आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती
हरभजन सिंग
भारत-पाकिस्तान सामन्यात कोणत्या संघाला विजय मिळेल? यावर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना हरभजन सिंग म्हणाला, हा सामना भारत जिंकणार. भारताकडे मजबूत फलंदाजीचं लाईन अप आहे. गोलंदाजीसाठी आमच्याकडे बुमराह, पंड्या, अर्शदीप आणि सिराजसारखे गोलंदाज आहेत. हे गोलंदाज त्यांच्यापेक्षा चांगले आहेत.
वसीम अकरम
भारतीय संघ फॉर्ममध्ये आहे. भारत अन्य संघापेक्षा चांगला खेळत आहे. भारतीय संघ टूर्नामेंटमध्ये सर्वांचा फेव्हरेट आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात अकरमने भारताला विजयाचा ६० टक्के दावेदार म्हटलं आहे. तर पाकिस्तानच्या जिंकण्याची शक्यता ४० टक्के असल्याचं अकरमने म्हटलं आहे.
नवज्योत सिंग सिद्धू
भारतीय संघ प्रतिस्पर्धी संघापेक्षा अनेक पटीने भारी आहे. संघाकडे तीन कौशल्यपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहे. ६ आणि ७ गोलंदाजीचे विकल्प आहेत. फलंदाजी फॉर्ममध्ये आहे. रोहितही फॉर्ममध्ये आहे. काहीही होऊ शकतं. पण संघाचा समतोल पाहता भारताचीच पक्कड मजबूत आहे.
सुनील गावस्कर
या सामन्यात भारतीय संघच जिंकेल. यात काहीही शंका नाही. खेळपट्टी पोषक नाही. परंतु, आमच्याकडे ४ क्वालिटी गोलंदाज आहेत. रोहितने अर्धशतक ठोकलं आहे. रिषभ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारत मजबूत स्थितीत आहे, असं मला वाटतं.
स्टीव्ह स्मिथ
भारत पुन्हा जिंकू शकतो. भारताकडे दोन क्वालिटी वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे भारत पुन्हा जिंकणार, असं मला वाटतं.
इरफान पठाण
पठाणनेही भारताला विजयाचा दावेदार म्हटलं आहे. पठाण म्हणाला, हा सामना भारत जिंकणार. कारण भारत एक मजबूत संघ आहे. पॉवर प्ले मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि रिषभ पंत चांगली फलंदाजी करत आहेत.
रमीज राजा
या सामन्यात भारत मजबूत स्थितीत आहे. कारण भारताने आतापर्यंत चांगला खेळ खेळला आहे. पाकिस्तानला खूप मेहनत घ्यायची गरज आहे.
श्रीसंत
भारतीय संघ हा सामना जिंकेल. भारत-पाकिस्तान सामन्यात प्रत्येक वेळी विराट कोहली एक्स फॅक्टर असतो. यावेळी हार्दिक पंड्या असेल.
अंबाती रायडू
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचाच विजय होईल. सामन्यात नाणेफेकीची महत्त्वाची भूमिका असेल.
पीयूष चावला
या सामन्यात भारतीय संघाचा विजय होईल, असं मला वाटतं. भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.