भारताचा मोठा विजय, 66 धावांवर न्यूझीलंड संघ तंबूत; मालिकाही केली आपल्या नावी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून मालिका जिंकण्याचे उद्दिष्ट काय ठेवले. त्यातच आज दोन्ही संघात निर्णायक तिसरा सामना पार पडला. दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरली. मात्र, या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत होती. हा निर्णायक सामना भारताने जिंकल्यामुळे भारताने ही मालिकाही ताब्यात घेतली आहे. सामना भारताने 168 धावांच्या तगड्या फरकाने जिंकला.
आधी नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खास झाली नाही, सलामीवीर ईशान किशन 1 धाव करुन स्वस्तात तंबूत परतला. मग गिलसोबत राहुल त्रिपाठीनं स्फोटक खेळी केली. 44 धावा करुन राहुल तंबूत परतला. मग सूर्यकुमारही 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कॅप्टन पांड्यानं गिलसोबत डाव सावरला. पांड्या 30 धावा करुन बाद झाला पण तोवर गिलनं तुफान फटकेबाजी करत 54 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. त्याने सामन्यात 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकार ठोकत नाबाद 126 धावा केल्या. हुडानं 2 धावांचं योगदान देत भारताची धावसंख्या 234 पर्यंत नेली.
त्यानंतर 120 चेंडूत 235 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंड संघाला सुरुवातीपासून भारतीय संघानं धक्के देण्यास सुरुवात केली. आजची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक फायद्याची असल्यानं भारतीय पेसर्सनी तशीच कामगिरी करत अवघ्या 66 धावांत किवी संघाला सर्वबाद केलं. या सामना भारताने 168 धावांच्या तगड्या फरकाने जिंकला.