उद्या होणार भारत आणि न्यूझीलंडमध्ये निर्णायक सामना; दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून मालिका जिंकण्याचे उद्दिष्ट काय ठेवले. आता उद्या या दोन्ही संघात याच मालिकेतील तिसरा निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. उद्या म्हणजेच बुधवारी (1 फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत उद्या जो कोणी जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल.
भारतीय संभाव्य संघ
ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल/पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, उमरान मलिक/शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड संभाव्य संघ
ड्वेन कॉन्वे (विकेटकीपर), फिन ऍलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉरी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि जेकब डफी.