IND vs AUS: सामन्यात पावसाचं सावट? सामना रद्द झाल्यास सेमीफायनलमध्ये पोहोचणार टीम इंडिया? असं आहे समीकरण
IND vs AUS, T20 World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ चा सुपर ८ चा ११ वा सामना होणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीकोनातून भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाने या सामन्यात विजय मिळवला तर, ते ग्रुप १ मधून थेट सेमीफायनलमध्ये पोहोचतील. परंतु, टीम इंडियाचा या सामन्यात पराभव झाला, तर टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा प्रवास खडतर होईल. टीम इंडियाला बांगलादेश आणि अफगानिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. दुसरा सेमीफायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर सुपर-८ ग्रुप मध्ये अव्वल स्थानावर राहिलेला संघ फायनलमध्ये पोहोचणार. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना भारतीय वेळेनुसार, २७ जूनला रात्री ८.३० वाजता सुरु होईल.
सामन्यावर पावसाचं सावट
सामन्याआधी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ ते ९ दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मैदानात पाऊस पडण्याची ६५ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना सकाळी १०.३० वाजता सुरु होणार आहे, (भारतीय वेळेनुसार रात्री ८.३०), अशातच जर पाऊस पडला, तर सामना सुरु होण्यास विलंब होऊ शकतो. तसच सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असू शकतो. सेंट लुसियामध्ये मागील २४ तासात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला जाईल.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होणार?
भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारताला ५ गुण मिळतील. तसच ऑस्ट्रेलियाला ३ गुण मिळतील. अफगानिस्तानकडे जास्तीत जास्त चार गुण मिळवण्याची संधी आहे. तर बांगलादेश जास्तीत जास्त २ गुण मिळवू शकतो. अशा परिस्थितीत भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहचेल. जर सामना रद्द झाला, तर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहचेल. याचसोबत टीम इंडिया सुपर-८ ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानावर राहील.
भारताचा पराभव झाल्यास टेन्शन वाढणार
पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं कमीत कमी पाच षटकांचा सामना खेळवण्याचा अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केला जाईल. पावसामुळे सामना रद्द झाला नाही आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला, तर भारताला आशा असेल की, अफगानिस्तानला बांगलादेशविरोधात विजय मिळावा. अफगानिस्तानचा मोठ्या अंतराने विजय न मिळाल्यास भारतीय संघाला याचा फायदा होऊ शकतो. अशावेळी भारत चांगल्या रनरेटनं ऑस्ट्रेलियाविरोधात सुपर ८ साठी क्वालिफाय करेल.