क्रीडा
Commonwealth Games : आज भारतीय महिला संघापुढे ऑस्ट्रेलियाचे आव्हान
आजपासून सुरू होणाऱ्या महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. भारतीय महिलांची आता सुरू असलेली कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियावर मात करत विजय मिळवण्याती संधी भारतीय महिलांना आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. भारतीय महिलांची आता सुरू असलेली कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियावर मात करत विजय मिळवण्याती संधी भारतीय महिलांना आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करायचे झाल्यास भारताला सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल.
हरमनप्रीतने सक्षमपणे भारताचे नेतृत्व केले आहे. भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवायचे झाल्यास स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
भारताने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. मेग लॅिनगच्या नेतृत्वाखाली खेळणारा कांगारूंचा संघ कोणत्याही संघाला पराभूत करण्यात सक्षम आहे.