Ind Vs Eng । भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून; पाहा वेळापत्रक

Ind Vs Eng । भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून; पाहा वेळापत्रक

Published on

टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे.

दरम्यान आतापर्यंत इंग्लंड आणि भारत या संघात एकूण १२६ कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी २९ सामन्यात भारताने, तर ४८ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर ४९ सामने अनिर्णित ठरले आहेत. या सामन्यांपैकी ६२ सामने इंग्लंडमध्ये झाले आहेत. त्यात ३४ सामन्यात इंग्लंडने, तर ७ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर २१ सामने अनिर्णित ठरले आहेत.

तसेच इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दुसरीकडे पावसाचं गणित रोज बदलत असतं त्यामुळे कदाचित पाऊस पडणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना : ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट ( ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम)
  • दुसरा कसोटी सामना : १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट ( लॉर्ड मैदान, लंडन)
  • तिसरा कसोटी सामना : २५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट (लीड्स)
  • चौथा कसोटी सामना : २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर (ओव्हल मैदान, लंडन)
  • पाचवा कसोटी सामना : १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर (ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅचेस्टर)

भारतीय संघ- रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, सूर्यकुमार यादव (अजून सामील होणे बाकी आहे), पृथ्वी शॉ (अजून सामील होणे बाकी आहे)

इंग्लंडचा संघ- जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉमिनिक सिबली, जोस बटलर, मार्क वुड, सॅम कुरन, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, झॅक क्रॉली, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, क्रेग ओव्हरटन

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com