India vs Australia Test
India vs Australia Test Team Lokshahi

पहिल्याच कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी

भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारताने पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 100 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात केवळ 177 धावा करू शकला. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 400 धावा केल्या आणि 223 धावांची मोठी आघाडी घेतली. त्याचवेळी दुसऱ्या डावात कांगारू संघाला केवळ 91 धावा करता आल्या. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. यासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या कसोटी सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडली. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा त्यांचा उद्दिष्ट होता. परंतु, भारताची स्टार फिरकीपटू जोडी जाडेजा आणि अश्विन यांनी अप्रतिम गोलंदाजी करत मिळून एकूण 8 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांत सर्वबाद केलं. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेनने 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. अश्विन-जाडेजाशिवाय शमी आणि सिराजनं एक-एक विकेट घेतली.  

223 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला संघाला स्टार फिरकीपटू आर अश्विनने तब्बल 5 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याच्या मदतीला जाडेजानंही कमाल गोलंदाजी केली. त्यानंही महत्त्वाचे दोन विकेट्स घेतले. याशिवाय शमीनं दोन आणि अक्षरनं एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 91 धावांवर सर्वबाद करत सामना एक डाव आणि 132 धावांनी भारताला जिंकवून दिला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ अखेरपर्यंत क्रिजवर 25 धावांवर नाबाद राहिला पण त्याला कोणाचीच साथ न मिळाल्याने सामना ऑस्ट्रेलियाने गमावला. या विजयासह भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com