भारताला मोठा धक्का; FIFA ने केले निलंबित, विश्वचषकाचे यजमानपदही हिसकावले

भारताला मोठा धक्का; FIFA ने केले निलंबित, विश्वचषकाचे यजमानपदही हिसकावले

जागतिक फुटबॉलची शिखर संस्था असलेल्या फिफा(FIFA)ने भारतीय फुटबॉल महासंघा (AIFF)ला मोठा धक्का दिला आहे.
Published on

नवी दिल्ली : जागतिक फुटबॉलची शिखर संस्था असलेल्या फिफा(FIFA)ने भारतीय फुटबॉल महासंघा (AIFF)ला मोठा धक्का दिला आहे. महासंघात होणाऱ्या हस्तक्षेपाचे कारण देत फिफाने भारताला निलंबित केले आहे. एवढेच नाही तर ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या फिफा अंडर-17 महिला विश्वचषक 2022 चे यजमानपदही हिसकावून घेतले आहे.

फिफाने म्हंटले की, भारतीय फुटबॉल महासंघात अवाजवी होणाऱ्या हस्तक्षेपाचे कारणाने भारताला तातडीने निलंबित केले आहे. फिफाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तर, यावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन केल्यास निलंबन मागे घेण्यात येईल, असेही फिफाने म्हटले आहे.

या वर्षी ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भारतात १७ वर्षाखालील महिला फुटबॉल वर्ल्डकप होणार आहे. मात्र, आता फिफाने केलेल्या कारवाईमुळे हा वर्ल्डकप देखील स्थगित झाला आहे. फिफाने दिलेल्या माहितीनुसार या भविष्यात या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. पण आता ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार भारतात आयोजित होऊ शकणार नाही.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला फिफाने तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपासाठी महासंघाला निलंबित करण्याचा इशाराही देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या महासंघाच्या निवडणुका घेण्याच्या निर्देशानंतर काही दिवसांतच हा इशारा देण्यात आला आहे. 28 ऑगस्ट रोजी महासंघाच्या निवडणुका होणार आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com