न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा; 'या' खेळाडूंचे होणार पुनरागमन
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय, टी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या सामन्यांमध्ये काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे तर काही खेळाडूंना वगळण्यातही आले आहे. बीसीसीआयने हे तीन संघ शुक्रवारी जाहीर केले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. तर या सामन्यांना 18 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. तसेच या सामन्यांमध्ये कर्णधरपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे असणार आहे. तर 27 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असणार आहे. तसेच 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 4 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांमध्ये कर्णधरपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे असणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे:
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र सिंग चहल, अर्शदीप सिंग उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मज शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.