IND VS SA T-20: भारत - दक्षिण आफ्रिका टी-20 सामन्याला आजपासुन होणार सुरुवात; कुठे आणि कसा पाहाल सामना?

IND VS SA T-20: भारत - दक्षिण आफ्रिका टी-20 सामन्याला आजपासुन होणार सुरुवात; कुठे आणि कसा पाहाल सामना?

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होत आहे. पहिला टी-20 सामना रविवारी आज म्हणजेच 10 डिसेंबर रोजी डर्बनमधील किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होत आहे. पहिला टी-20 सामना रविवारी आज म्हणजेच 10 डिसेंबर रोजी डर्बनमधील किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होत आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. भारतीय संघानेही दक्षिण आफ्रिकेत पोहोचून जोरदार तयारी सुरू केली आहे. या सामन्याचा तुम्ही घरी बसून आनंद घेऊ शकता. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे विनामूल्य पाहता येणार जाणून घेऊया.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामने डिस्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहेत. याशिवाय जर तुम्हाला टीव्हीवर सामना पाहायचा असेल, तर तुम्ही तो स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याच्या दुखापतीमुळे सुर्यकुमार यादव याला ऑस्ट्रेलियानंतर पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी मिळाली आहे.

IND VS SA T-20: भारत - दक्षिण आफ्रिका टी-20 सामन्याला आजपासुन होणार सुरुवात; कुठे आणि कसा पाहाल सामना?
Animal Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'चा धुमाकूळ! केली एवढ्या कोटींची कमाई

किंग्समीड स्टेडियमवर आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्याचा निकाल लागला आहे. या ठिकाणी एक सामना बरोबरीत आणि एक अनिर्णित राहिला, दोन्ही सामने भारताचे होते. भारतीय क्रिकेट संघाने येथे 3 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. किंग्समीड स्टेडियमवरील 16 टी-20 सामन्यांपैकी, प्रथम लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या संघाने 8 वेळा विजय मिळवला आहे तर प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने तितक्याच वेळा विजय मिळवला आहे.

टीम इंडिया टी-20 टीम: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.

दक्षिण आफ्रिका टी-20 टीम: एडेन मारक्रम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com