IND vs PAK
IND vs PAKTeam Lokshahi

दिवाळीच्या आधी भारत पाकिस्तान आमने- सामने; कोण जिंकणार पहिला सामना

सुपर-12 च्या गट-बमध्ये भारतीय संघाचा समावेश आहे. तसेच ब गटामध्ये टीम इंडियाशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे.
Published by :
shamal ghanekar
Published on

भारतीय क्रिकेट संघाने टी20 वर्ल्ड कप 2022 ची जोरदार तयारी सुरू केली आहे. टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर होणार आहे. हा सामना दिवाळी एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये येथे खेळला जाणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये क्रिकेटप्रेमींचेही लक्ष लागले आहे. हा सामना दोन्ही संघासाठी अटीतटीचा असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

IND vs PAK
आशिया कप 2022 IND vs PAK : जर रोहित शर्माने नाणेफेक जिंकली तर सामना जिंकलाचं समजा, कारण...

सुपर-12 च्या गट-बमध्ये भारतीय संघाचा समावेश आहे. तसेच ब गटामध्ये टीम इंडियाशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. तसेच भारतीय संघ जोरदार तयारी करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक 2022 मधील दोन्ही संघ:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उप-कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी

पाकिस्तान संघ: बाबर आजम (कप्तान), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, ​​शाहीन शाह आफरीदी, शान मसूद, फखर जमां.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com