भारत-पाकिस्तान महामुकाबल्याला सुरुवात; पाकिस्तानने नाणेफेक जिंकली
कोलंबो : श्रीलंकेतील कोलंबो शहरात भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याला सुरुवात झाली. यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियानं या सामन्यासाठी फलंदाज श्रेयस अय्यरला संघातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. तर के एल राहुल या यष्टीरक्षक फलंदाजाने संघात पुनरागमन केलं आहे. याआधी याच आशिया चषकात 2 सप्टेंबरला हे दोन्ही संघ आमनेसामने होते. यावेळी पावसामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता हे दोन्ही संघ पुन्हा मैदानात उतरलेत. विशेष म्हणजे आशिया चषकाच्या सुपर ४ फेरीतील हा सामना असल्यानं दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून सध्या संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे.
भारताचे प्लेइंग-11:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
पाकिस्तानचे प्लेइंग-11:
फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.