दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला बांगलादेश 7/0, भारताकडे 80 धावांची आघाडी
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सध्या ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. याच सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. भारताने आधी 227 धावांवर बांगलादेशला सर्वबाद केलं. ज्यानंतर भारताने पंतच्या 93 आणि अय्यरच्या 87 धावांच्या जोरावर 314 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. दिवस संपताना बांगलादेशचा स्कोर 7 धावांवर शून्य बाद होता. ज्यामुळे भारत 80 धावांच्या आघाडीवर आहे.
नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना 227 धावांत सर्वबाद केलं. बांगलादेशचा संघ 73.5 षटकंच खेळू शकला. यामध्ये उमेश यादवने 4 तर जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन यानेही 4 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर भारतीय संघ मैदानात उतरला. सलामीवीर केएल राहुल 10 तर शुभमन गिल 20 धावा करुन तंबूत परतले. कोहली आणि पुजारा कमाल करतील असे वाटत होते पण दोघेही प्रत्येकी 24 धावा करुन बाद झाले. ज्यानंतर मात्र ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरनं डाव सावरला. दोघांनी 150 हून अधिक धावांची भागिदारी केली. ज्यानंतर इतर खेळाडू स्वस्तात बाद झाले आणि 314 धावांवर भारताचा डाव आटोपला.