IND VS AUS: भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत्य फेरीत केला जोरदार प्रवेश

IND VS AUS: भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत्य फेरीत केला जोरदार प्रवेश

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

रोहित शर्मानंतर अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने सोमवारी आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर एट टप्प्यातील गट एकच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केल्यावर सांगितले की, त्याच्या झंझावाती अर्धशतकादरम्यान, त्याला फक्त फलंदाजी करायची होती. तीच स्टाईल तो आजपर्यंत करत आला आहे.

रोहितने 41 चेंडूत सात चौकार आणि आठ षटकारांसह 92 धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामुळे भारताने चालू स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या पाच विकेट्सवर 205 धावांपर्यंत पोहोचवली. त्याने ऋषभ पंत (15) सोबत दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 38 चेंडूत 87 धावांची भागीदारी केली. सामनावीर म्हणून निवड झालेल्या रोहितने सांगितले की, तो आजवर करत असलेल्या शैलीतच फलंदाजी करू इच्छितो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com