India VS England 1st Test Match: भारत-इंग्लंड पहिला कसोटी सामना; कुठे आणि कसा पाहता येणार?
भारत आणि इंग्लंड 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भिडण्यासाठी सज्ज आहेत. इंग्लंडचा हॅरी ब्रूक संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे, तर भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांचा भाग असणार नाही. या दोन्ही खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळणार आहेत. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि भारत कसोटी सामन्यात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. सामना किती वाजता सुरू होईल आणि हा सामना कुठे विनामूल्य पाहता येईल हे पाहा.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनूसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. हा सामना तुन्ही नेटवर्क 18 स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. तर जियो सिनेमावर फुकटात लाईव्ह पाहता येणार आहे. या सामन्याचा आनंद तुम्ही हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये घेऊ शकता.जियो सिनेमा अॅपसह तुम्ही हा सामना जियो सिनेमाच्या वेबसाईटवर जाऊनही लाईव्ह पाहू शकता.
25-29 जानेवारी 2024 - पहिली कसोटी - हैदराबाद
2-6 फेब्रुवारी 2024 - दुसरी कसोटी विशाखापट्टणम
15-19 फेब्रुवारी 2024 - तिसरी कसोटी - राजकोट
23-27 फेब्रुवारी 2024 - चौथी कसोटी - रांची
7-11 मार्च 2024 - पाचवी कसोटी - धरमशाला
पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
टीम इंग्लंड संघाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.