IND vs ENG 4th Test: भारताने इंग्लंडला 5 गडी राखून केले पराभूत

IND vs ENG 4th Test: भारताने इंग्लंडला 5 गडी राखून केले पराभूत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5व्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळवला गेला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5व्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळवला गेला. टीम इंडिया आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना रोहित अँड कंपनीने चौथ्याच दिवशी जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने 3-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या.

दरम्यान, शुबमन गिल याने अर्धशतकाच्या जवळ आल्यावर दोन खणखणीत षटकार मारले. सामन्यात त्याने पहिली बाऊंड्री ही 120व्या चेंडूवर मारली. जुरेलचा हा दुसरा कसोटी सामना होता, मात्र एखाद्या परिपक्व खेळाडूसारखा तो मैदानावर आपला खेळ दाखवत होता. टीम इंडियाची भावी विकेटकीपर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com