सुनील छेत्रीचा 'तो' गोल अन् अखेरच्या क्षणी भारताने बांगलादेशचा उडवला धुव्वा
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने बांगलादेशचा पराभव केला. आणि सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिला विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 1-0 असा पराभव केला. कर्णधार सुनील छेत्रीने अखेरच्या क्षणी भारतासाठी निर्णायक गोल केला.
भारत विरुध्द बांगलादेश संघांच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत भारत-बांगलादेशच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. पण, भारतीय संघाने उत्तरार्धात चमकदार कामगिरी केली. मात्र, दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा उठवण्यात त्यांना अपयश आले.
या सामन्याच्या पहिले बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले. या सामन्यातील निर्णायक गोल सुनील छेत्रीने 85व्या मिनिटाला केला. सुनील छेत्रीने पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला.
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय फुटबॉल संघाला यजमान चीनचे आव्हान होते. मात्र या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी बांगलादेशी संघाला आपल्या पहिल्या सामन्यात म्यानमारविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र, भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला आहे.