IND vs WI 2nd T20 : भारताला दुसऱ्या सामन्यात स्वीकारावा लागला पराभव

IND vs WI 2nd T20 : भारताला दुसऱ्या सामन्यात स्वीकारावा लागला पराभव

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या सामन्यात भारताला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्कमध्ये खेळण्यात आला. भारताने विजयासाठी दिलेले १३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजने चार चेंडू शिल्लक असतानाच विजयावर शिक्कामोर्तब केले.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या सामन्यात भारताला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्कमध्ये खेळण्यात आला. भारताने विजयासाठी दिलेले १३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजने चार चेंडू शिल्लक असतानाच विजयावर शिक्कामोर्तब केले. डेव्हॉन थॉमसने नाबाद १९ आणि कर्णधार निकोलस पूरनने १४ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, आर अश्विन, हार्दिक पांड्या आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने ६८ धावांनी जिंकला होता. तर, दुसरा सामना विंडीजने जिंकला आहे. कर्णधार रोहित शर्मा डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या षटकात सूर्यकुमार यादव (११), पाचव्या षटकात श्रेयस अय्यर (१०) आणि सातव्या षटकात ऋषभ पंत (२४) एकापाठोपाठ बाद झाले. त्यानंतर हार्दिक आणि जडेजाने पाचव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली. ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी निष्प्रभ ठरली. संपूर्ण भारतीय संघ १९.४ षटकांमध्ये केवळ १३८ धावांवर गुंडाळला गेला.

भारताने विजयासाठी दिलेले १३९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजने चार चेंडू शिल्लक असतानाच विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने अर्धशतकी खेळी करून सर्वाधिक ६८ धावा केल्या. त्यामध्ये आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. त्याशिवाय डेव्हॉन थॉमसने नाबाद १९ आणि कर्णधार निकोलस पूरनने १४ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, आर अश्विन, हार्दिक पांड्या आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com